तुमची झोप उडेल आलियाच्या सँडलची किंमत ऐकूण


आपल्या फिटनेससोबतच अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या स्टाईलसाठीही ओळखली जाते. त्यातच आलियाला आपल्या लुकने समोरच्याला घायाळ कसे करायचे हे उत्तम अवगत आहे. सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमात तिच्या हँडबॅगपासून ते ड्रेस आणि फुटवेअरपर्यंत साऱ्याच गोष्टींची चर्चा होते. आलिया नेहमीच जगातील महागड्या ब्रँडच्या वस्तु विकत घेण्याला प्राधान्य देते.

आलिया नुकतीच गडद गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये आणि ट्रान्सपरन्ट सॅडलमध्ये दिसली. सध्या सोशल मीडियावर तिची हीच ट्रान्सपरन्ट सँडल ट्रेण्ड करत होती. इटालियन ब्रँड Neous ची ही ट्रान्सपरन्ट सँडल आहे. या सँडलचा सोल आणि लायनिंग 100 टक्के लेदर पासून तयार करण्यात आले आहे. आलिया भट्टने घातलेली ही सँडल तब्बल 50 हजार रुपयांहून जास्त किंमतीची आहे.

आलियाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. अयान मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. याशिवाय सध्या ती वडील महेश भट्ट दिग्दर्शित सडक 2 चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. बाप-लेकीची जोडी पहिल्यांदा एकत्र काम करत आहे.

ती यानंतर करण जोहरच्या तख्त चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. हा एक मल्टी स्टारर चित्रपट आहे. रणवीर सिंहसोबत पुन्हा एकदा ती काम करणार आहे. कलंक हा तिचा शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणदणीत आपटला होता.

Leave a Comment