रॉयल एनफील्डचे हे शानदार मॉडेल भारतात लाँच


रॉयल एनफील्डने आपली सर्वात लोकप्रिय बाइक क्लासिक 350 चे नवीन मॉडेल भारतीय बाजारात लाँच केले आहे. रॉयल एनफील्ड क्लासिक 350 एस या नावाने लाँच करण्यात आलेल्या या नवीन बाइकची किंमत 1.45 लाख रूपये आहे. या बाइकची किंमत स्टॅन्डर्ड क्लासिक 350 च्या तुलनेत 9 हजार रूपये कमी आहे. किंमत कमी ठेवण्यासाठी कंपनीने यात सिंगल चॅनेल एबीएस दिले आहे.

(Source)

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 एस ही नवीन बाइक प्यूर ब्लॅक आणि कर्मरी सिल्वर अशा दोन रंगांमध्ये उपबल्ध असणार आहे. व्हिल्ज आणि इंजिन ब्लॉकला काळा रंग देण्यात आला आहे. या नवीन बाइकच्या फ्यूल टँकवरती कंपनीचा लोगो देखील वेगळ्या स्टाइलमध्ये देण्यात आला आहे.

(Source)

इंजिनबद्दल सांगायचे तर यामध्ये स्टँडर्ड क्लासिक 350 प्रमाणेच 346 सीसी सिंगल सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. ते 9.8hp पॉवर आणि 28Nm टॉर्क जनरेट करते.

(Source

कंपनीचे हे नवीन मॉडेल सध्या केवळ दक्षिणेतील राज्यांमध्ये उपलब्ध असून, लवकरच इतर राज्यांमध्ये विक्री सुरू होईल.

Loading RSS Feed

Leave a Comment