
अमेरिकन खुल्या स्पर्धेचे कॅनडाच्या 19 वर्षीय बियांका अँड्रेस्क्यूने विजेतेपद पटकावले. 23 वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेना विल्यम्सला पराभूत करून तिने इतिहास रचला. ग्रँडस्लॅम जिंकणारी बियांका कॅनडाची पहिली खेळाडू ठरली आहे. तिने सेरेनाला सरळ सेटमध्ये 6-3, 7-5 ने पराभूत केले. बियांका सर्वात कमी वयात ग्रँडस्लॅम जिंकणारी दुसरी विजेती ठरली आहे.
19व्या वर्षी युएस ओपन जिंकणाऱ्या या खेळाडूच्या अदा पाहून तुम्हीही व्हाल फिदा!
याआधी मारिया शारापोव्हाने 2006 मध्ये हा विक्रम केला आहे. गेल्या वर्षी बियांका क्रमवारीत पहिल्या 200 मध्येही स्थान मिळवू शकली नव्हती. तर ती आता 15 व्या स्थानी पोहोचली आहे. बियांकाला गेल्या वर्षी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी पात्रही ठरली नव्हती. ती यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न करत होती. बियांकाने 2019 च्या सुरुवातीला बीएनपी परिबास स्पर्धा जिंकली होती.
ती एका दुखापतीमुळे संपूर्ण हंगाम बाहेर राहिली होती. बियांकाने त्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा जिंकली. सेरेना विल्यम्सने पहिल्यांदा अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा जिंकली होती तेव्हा बियांकाचा जन्मही झाला नव्हता. आतापर्यंत 6 वेळा या स्पर्धेचे सेरेनाने विजेतेपद पटकावले आहे. तर बियांकाने पहिल्यांदाच पात्र ठरल्यानंतर थेट तिने विजेतेपदाला गवसणी घातली.
रोमानियात बियांकाचे आई-वडील राहणारे आहेत. कॅनडाला दोघेही स्थलांतरीत झाले. त्यानंतर तेथील नागरिकत्व घेतले आहे. कॅनडात बियांकाचा जन्म झाला आहे. सेरेनाला अमेरिकन खुल्या स्पर्धेत पाठिंबा देणाऱ्या प्रेक्षकांची संख्या जास्त होती. सेरेनाने एक गुण पटकावला तरी जल्लोष केला जात होता. बियांकाने एकवेळ कानावर हात ठेवले हेत.
तिने सामना जिंकल्यानंतर सेरेनाच्या पराभवाबद्दल प्रेक्षकांची माफी मागितली. ती म्हणाली की, मी वाईट वाटत आहे. मला माहिती आहे तुम्हाला सेरेनाला जिंकताना बघायचे होते.
