पितृपक्षात यामुळे या पक्षी आणि प्राण्यांना दिले जाते सर्वात जास्त महत्व

पितृपक्ष आजपासून सुरू झाला असून, यामध्ये पितरांच्या आत्म्यांना शांती लाभावी यासाठी श्राद्ध घातले जाते. श्रध्देने आपण जे अन्न पितरांना अर्पण करतो त्यालाच श्राद्ध म्हटले जाते. पितृपक्षा दरम्यान तुमच्या घरी जेवण बनवल्यावर त्यातील एक हिस्सा गाय, कुत्रा आणि कावळ्याला नक्की द्यावा. असे केल्याने ते भोजन पितरांना प्राप्त होते.

धार्मिक मान्यतांनुसार, पितृपक्षा दरम्याने जेव्हा श्राद्ध कर्म केले जाते, तेव्हा आपले पितरं प्राणी-पक्ष्यांच्या माध्यमातून आपल्या जवळ येतात आणि त्यांच्याद्वारेच भोजन ग्रहण करतात.

(Source)

श्राद्धाच्या वेळी बनवण्यात येणाऱ्या जेवणातील काही भाग हिस्सा गाय, कुत्रा आणि कावळ्याला दिला जातो. जेव्हा श्राद्धाचे भोजन काढले जाते, त्यावेळी त्याचे पाच भाग केले जातात. चार भाग हे गाय, कुत्रा, कावळा आणि मुंगीसाठी तर पाचवा भाग हा देवांसाठी काढला जातो.

अशी मान्यता आहे की, कावळा वायूचे, कुत्रा जलचे, मुंगी अग्नीचे, गाय पृथ्वीचे आणि देव आकाशाच्या तत्वांचे प्रतीक आहे. या पाचही तत्वांना जेवण देऊन पंचतत्वाप्रती आदर व्यक्त केला जातो.

(Source)

पौराणिक मान्यतांनुसार, जर तुम्ही पितृपक्षामध्ये केवळ गाईची सेवा केली तर तुम्ही पितर तृप्त होता. गाईमध्ये पंच तत्व असतात, तिची सेवा केल्याने, तिला चारा पाणी दिल्याने पितर प्रसन्न होतात.

Leave a Comment