झोमॅटोची व्हिडीओ स्ट्रिमिंग सेवा लाँच

ऑनलाइन फुड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने नेटफ्लिक्स-अ‍ॅमेझॉनला टक्कर देण्यासाठी व्हिडीओ स्ट्रिमिंग सर्विसची घोषणा केली आहे. झोमॅटो पुढील तीन महिन्यात 18 ओरिजनल शो लाँच करणार आहे. या व्हिडीओ स्ट्रिमिंग सेवेचे सुरूवात 16 सप्टेंबरपासून होईल. व्हिडीओ स्ट्रिमिंगसाठी युजर्सला झोमॅटो अ‍ॅपवरच व्हिडीओ सेक्शन मिळेल.

झोमॅटोच्या या व्हिडीओ स्ट्रिमिंग सर्विसमध्ये जेवणासंबंधीत व्हिडीओ दाखवले जातील. मात्र त्याचबरोबर यामध्ये कॉमेडी, रियालिटी, इंटरटेनमेंट आणि इंटरव्यू सारखे शो देखील पाहायला मिळतील. या व्हिडीओचा कालावधी हा 3 मिनिट ते 15 मिनिटांच्या मध्ये असेल. ग्राहकांना यावर 2 हजार पेक्षा अधिक व्हिडीओ पाहायला मिळतील. विशेष म्हणजे हे जगभरातील कोणत्याही देशात हे व्हिडीओ पाहायला मिळतील.

याबाबतची माहिती झोमॅटोच्या ट्विट हँडलवरून देण्यात आली आहे. झोमॅटोने ट्विट करत लिहिले की, आता आम्ही व्हिडीओ देखील बनवणार आहोत.

झोमॅटो आता नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन, हॉटस्टार, जी5 या सारख्या व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मला टक्कर देणार आहे.

Leave a Comment