रानू मंडल यांची गुगल ट्रेण्डमध्ये लतादीदींशी स्पर्धा


रानू मंडल हे नाव आता कोणालाही अपरिचित राहिलेले नाही. त्या सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडीओमुळे रातोरात प्रसिद्ध झाल्या आणि त्यांचे नाव अगदी गानकोकीळा लतादीदींपर्यंत पोहोचले. रानू यांना चित्रपटात पार्श्वगायन करण्याची संधीसुद्धा गायक-संगीतकार हिमेश रेशमियाने दिली. रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाणे गाणाऱ्या रानूंची गुगल ट्रेण्डमध्ये लतादीदींशी स्पर्धा होऊ लागली आहे.

गुगलचा मागील ३० दिवसांचा ट्रेण्ड पाहिल्यास रानू मंडल यांच्याविषयीचा गुगल सर्च लतादीदी यांच्या एवढेच होऊ लागला आहे. लतादीदींपेक्षाही जास्त ऑगस्टच्या अखेरीस तर रानू यांचा सर्च आहे. रानू यांच्याविषयीचा सर्च सर्वाधिक महाराष्ट्रासोबतच, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड या राज्यांमध्ये होऊ लागला आहे.

लता मंगेशकर यांनी रानू यांच्या गाण्याच्या शैलीवर टीका केली होती. मी गायलेली गाणी गाऊन, माझ्या नावामुळे आणि माझ्या कामामुळे कुणाचे भले झाले तर मी स्वतःला भाग्यवान समजते. पण कोणाची नक्कल करुन मिळणारी प्रसिद्धी दीर्घकाळ टिकत नसल्याचे लता मंगेशकर म्हणाल्या होत्या. त्यावर मी कोणाच्याही आवाजाची नक्कल केली नाही. मी माझ्याच आवाजात गाणे गायले आहे. असे म्हणत राणू मंडल यांनी लता मंगेशकर यांना उत्तर दिले.

Leave a Comment