‘या’ गंभीर आजाराविरोधात 6 वर्षांपासून लढत आहे आशिकी गर्ल


बॉलीवूडची आशिकी गर्ल अर्थात अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने साहो आणि छिछोरे असे एकामागोमाग एक दोन सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर जोरदार चर्चेत आहे. पण मागील 6 वर्षांपासून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी हिच अभिनेत्री एक गंभीर आजाराने ग्रस्त आहे.

बॉक्स ऑफिसवर श्रद्धाचा नुकताच रिलीज झालेला चित्रपटा ‘छिछोरे’ यशस्वी ठरल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आजाराचा श्रद्धाने खुलासा केला. श्रद्धा ‘छिछोरे’च्या यशानंतर पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखती दरम्यान म्हणाली, मागच्या 6 वर्षांपासून मी Physical Anxiety ने आजारी आहे. पण मला याबद्दल सुरुवातीला काहीच माहित नव्हते.

श्रद्धा सांगते, या आजाराविषयी मला माझा पहिला चित्रपटा ‘आशिकी 2’ नंतर समजले. माझे संपूर्ण शरीर दुखत असे. त्यामुळे अनेक टेस्ट केल्या डॉक्टर्स बदलले. मात्र कोणत्याही टेस्टमध्ये काहीही समस्या दिसून आली नाही. मला त्यानंतर समजले की मला Physical AAnxiety आहे. मी या आजाराशी आजही झगडते आहे. पण मी हे स्विकारले आहे की मला हा आजार आहे. त्यामुळे पहिल्यापेक्षा आता मला खूप कमी त्रास होतो.

श्रद्धा सांगते, तुमच्यातील एखादी नकारात्मक गोष्टही जेव्हा सकारात्मक दृष्टीकोणतून स्वीकारता तेव्हा त्याचा सामना करणे तुम्हाला सोपे जाते. दरम्यान श्रद्धाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिचे ‘साहो’ आणि ‘छिछोरे’ हे दोन चित्रपट नुकतेच रिलीज झाले. याशिवाय लवकरच तिचा ‘स्ट्रीट डान्सर 3D’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच ती ‘बागी 3’ मध्ये टायगर श्रॉफसोबत दिसणार आहे.

Leave a Comment