व्हॉट्सअ‍ॅपचे फिंगर प्रिंट लॉक हे फिचर अँड्रॉईडवर अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी


व्हॉट्सअ‍ॅप बीटा व्हर्जनवर 2.19.221 हे फीचर अँड्रॉईड युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. फिंगर प्रिंट लॉक अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी सर्वांत आधी अकाउंट सेटिंगमध्ये जावे. येथे प्रायव्हसी ऑप्शनवर क्लिक करून फिंगर प्रिंट लॉक ऑप्शनमध्ये जा आणि फीचर अ‍ॅक्टिव्हेट करा.

याचे वैशिष्ट्य म्हणजे यात अ‍ॅप किती वेळासाठी लॉक करायचे आहे? याचाही पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध करून दिला गेला आहे. यासाठी त्वरित, 1 मिनिट आणि 30 मिनिटे असे पर्याय तुम्हाला तेथे दिसतील.

आयफोन युझर्ससाठी व्हॉट्स अ‍ॅप फिंगरप्रिंट लॉक फीचर अ‍ॅक्टिव्हेट करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. यात अॅप सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी ऑप्शनवर क्लिक करा. स्क्रीन लॉक ऑप्शन, त्यातील टॉगल ऑन करा. फीचर अ‍ॅक्टिव्हेट होईल.

Leave a Comment