आता व्यायामासाठी वापरण्यात येत आहेत ‘अंडरवॉटर ट्रेडमिल्स’

underwater
व्यायामासाठी उपलब्ध होत असणाऱ्या नवनवीन उपकरणांमध्ये आता ‘अंडरवॉटर ट्रेडमिल्स’ ची भर पडली आहे. या ट्रेडमिल्सवर धावून व्यायाम करण्याचा अनुभव आगळावेगळा आहे. मात्र या ट्रेडमिल्सची किंमत खूप जास्त असल्यामुळे ही सध्या तरी ही ट्रेडमिल्स अभावानेच पहावयास मिळत आहेत. एका अंडरवॉटर ट्रेडमिलची किंमत तब्बल सत्तर हजार पाउंड्स आहे. अश्या प्रकारच्या अंडरवॉटर ट्रेडमिल्स हे व्यायामासाठी अतिशय प्रभावी उपकरण असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
underwater1
सामान्य ट्रेडमिल वर धावताना शरीरातील सांध्यांना मोठ्या प्रमाणामध्ये झटके जाणवत असतात. मात्र अंडरवॉटर ट्रेडमिल ही पाण्याच्या आत असल्याने यामुळे सांध्यांना झटके लागल्याविना ट्रेडमिलवर धावता येणे शक्य होते. त्यामुळे ज्यांना संधिवात, गुडघेदुखी यासारख्या समस्या सतावत असतील त्यांच्या करिता हे उपकरण मोठे सहायक ठरणार आहे. या ट्रेडमिलवर धावताना व्यक्ती छातीइतक्या खोल पाण्यामध्ये असल्याने व्यक्तीचे वजन सुमारे ऐंशी टक्के कमी जाणवते. त्यामुळे या ट्रेडमिलवर विनासायास धावणे शक्य होते.
underwater2
या ट्रेडमिलचा वापर विशेषतः सांधेदुखी असणाऱ्या किंवा नुकतीच गुडघ्याची किंवा तत्सम शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींसाठी विशेष उपयुक्त आहे. अश्या व्यक्तींना व्यायाम करताना सांध्यांवर जास्त भार येऊ न देण्याची खबरदारी घ्यावी लागत असल्याने या कामी अंडरवॉटर ट्रेडमिल सहाय्यक ठरत आहे. तसेच वयस्क व्यक्तींसाठी देखील ही ट्रेडमिल उपयुक्त आहे. अश्या या बहुगुणी ट्रेडमिलची खरेदी करावयाची असल्यास मात्र भरपूर पैसे मोजण्याची तयारी असणे गरजेचे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment