स्मरणशक्ती वाढविण्यासाठी ‘हाकिनी योगमुद्रा’ उपयुक्त

mudra
नववर्षाचा उल्लास आता सरला आहे आणि विद्यार्थी वर्गाला आता वेध लागले आहेत ते लवकरच येणार असलेल्या वार्षिक परीक्षांचे. सर्वसाधारणपणे मार्च ते एप्रिल महिन्यांच्या दरम्यान होणार असलेल्या या परीक्षांची तयारी, विद्यार्थी आतापासून करण्यास सुरुवात करीत असतात. पालकही या काळामध्ये मुलांच्या खाण्या-पिण्याची, त्याच्या तब्येतीची काळजी घेण्यामध्ये कोणतीही कसर बाकी ठेवीत नाहीत. या काळामध्ये मुलांची स्मरणशक्ती चांगली राहावी या करिता योग्य आहार, नियमित आणि पुरेशी झोप मुलांना मिळणे आवश्यक असते. यामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते.
mudra1
मुलांची स्मरणशक्ती चांगली राहावी याकरिता योगसाधनेची मदत देखील घेता येऊ शकेल. मेंदू सक्रीय राहून स्मरणशक्ती चांगली राहावी या करिता योगसाधनेमध्ये हाकिनी मुद्रा सांगितली गेली आहे. एखाद्या गोष्टीचा विसर पडत असल्यास ही मुद्रा लावून त्या वस्तूचे स्मरण करण्याचा प्रयत्न केल्याने ती गोष्ट आठविण्याची शक्यता मोठी असते. विद्यार्थ्यांच्याखेरीज ज्यांना वारंवार काही ना काही गोष्टी विसरण्याची सवय असते, त्यांच्यासाठी देखील ही मुद्रा लाभदायी आहे.
mudra2
ही मुद्रा करण्यासाठी दोन्ही हातांच्या पाचही बोटांचे अग्रभाग जुळवावे. त्यानंतर डोळे वरच्या बाजूला फिरवून त्यांवर अगदी हलका ताण द्यावा. श्वास घेत आपली जीभ हिरड्यांना टेकवावी. त्यानंतर श्वास सोडत जीभ पूर्वस्थितीत आणावी. ही मुद्रा करताना श्वासोच्छ्वास दीर्घ असावा. विद्यार्थांच्या करिता स्मरणशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने ही मुद्रा अतिशय लाभदायक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment