यामुळे पंतप्रधान मोदींनी ‘कुली नंबर 1’ च्या टीमचे केले कौतूक

अभिनेता वरूण धवन आणि सारा अली खान यांचा आगामी चित्रपट ‘कुली नंबर 1’ साठीच्या टीमसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास ट्विट केले आहे. पंतप्रधान मोदींचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कुली नंबर 1 च्या टीमने काही दिवसांपुर्वी जाहीर केले होते की, ते सेटवर प्लास्टिकचा वापर करणार नाहीत. याबद्दल वरूण धवनने ट्विट देखील केले होते. यानंतर आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्विटला उत्तर दिले आहे.

वरूण धवनने पीएमओला टॅग करत ट्विट केले होते की, प्लास्टिक मुक्त राष्ट्र बनवणे ही वेळेची गरज आहे. आपल्या पंतप्रधानानी मोठ्या गोष्टीची सुरूवात केली आहे. आपण छोट्या छोट्या बदलांद्वारेच मोठे परिवर्तन घडवू शकतो. कुली नंबर 1 च्या सेटवर केवळ स्टीलच्या बॉटल्सचा वापर केला जात आहे.

वरूण धवनच्या या ट्विटवर पंतप्रधान मोदींनी देखील उत्तर दिले आहे. त्यांनी ट्विट केले की, कुली नंबर 1 च्या टीमकडून शानदार सुरूवात. हे बघुन आनंद होतो की, चित्रपट सृष्टीतील लोक देखील प्लास्टिक मुक्त भारत बनवण्याच्या दिशेने आपले योगदान देत आहेत.

पंतप्रधान मोदी आणि वरूण धवन यांचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Leave a Comment