चलानपासून वाचण्यासाठी ही खतरनाक करामत, नेटकऱ्यांनी दिली समज - Majha Paper

चलानपासून वाचण्यासाठी ही खतरनाक करामत, नेटकऱ्यांनी दिली समज

ट्रॅफिकचे नवीन नियम लागू झाले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून पोलिस दंड वसूल करत आहेत. गाडीच्या किंमतीपेक्षाही अधिक दंड आकारला जात आहे. चलानपासून वाचवण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या पध्दती देखील सांगत आहेत. यातच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चलानपासून वाचण्यासाठी भन्नाट पण धोकादायक फॉर्म्युला सांगण्यात आला असून, हा व्हिडीओ बघून तुम्ही देखील हैराण व्हाल.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती हटके अंदाजाच दुचाकी चालवत आहे. तो व्यक्ती मागच्या सीटवर दोन्ही पाय एकाबाजूला करून बसला आहे आणि गाडी आपोआप चालत आहे. या खतरनाक स्टंटचा व्हिडीओ टिव्ही शो तारक मेहता का उल्टा चश्माचे डायरेक्टर असित कुमार मोदींनी ट्विटरवर शेअर केले आहे.

व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले की, आहे की नाही स्टाइल. आता चलान कोणाचे व कसे कापणार ?

काही युजर्सला हा स्टंट मजेशीर वाटत आहे तर काहींना धोकादायक. एका युजरने लिहिले की, जेव्हा खाली पडेल तेव्हा याचे आयुष्याचेच चलान निघालेले असेल. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, हा व्यक्ती चलानपासून नाही वाचू शकत. कारण, पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट घालणे देखील सक्तीचे आहे.

 

Leave a Comment