पाकिस्तानबरोबरील तणाव वाढत असतानाच बुधवारी भारत आणि चीनचे सैन्य लद्दाख येथे एकमेकांना भिडल्याची घटना घडली आहे. भारतीय सैन्य आणि चीनी सैनिकांमध्ये बराच वेळ धक्का-बुक्की सुरू होती.
लद्दाखच्या पैंगोंग सरोवराजवळ भारत-चीन सैनिकांमध्ये धक्काबुक्की
ही घटना 134 किलोमीटर लांब पैंगोंग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर ही घटना घडली. याचा एक तृतीयांश हिस्सा हा चीनच्या ताब्यात आहे.
भारतीय सैनिक पेट्रोलिंग करत असतानाच त्यांचा सामना चीनच्या पिपल्स लिब्रेशन आर्मीबरोबर झाला. चीनी सैनिक भारतीय सैनिकांच्या तेथील उपस्थितीला विरोध करू लागले. त्यानंतर दोन्ही सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली. 2017 मध्ये देखील भारत आणि चीनी सैन्य डोकलाममध्ये समोरासमोर आले होते. मात्र त्यानंतर 73 दिवसांनी सैन्य मागे घेण्यात आले होते.
या घटनेनंतर दोन्ही सैन्याने तेथील सैनिकांच्या संख्येत वाढ केली आहे. भारतीय सैन्याने या प्रकरणाबद्दल सांगितले की, चर्चेनंतर दोन्ही सैन्यातील तणाव कमी झाला आहे.
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव देखील वाढला आहे. या प्रकरणात चीन पाकिस्तानच्या बाजूने दिसत आहे. त्यातच आता ही घटना घडली आहे.