2100 वर्ष जुन्या सांगाड्याजवळ सापडली आयफोनसदृश्य वस्तू

सध्या स्मार्टफोनचा वापर प्रत्येकजण करत आहे. मात्र या स्मार्टफोनची सुरूवात अगदी काही वर्षांपुर्वीच झाली आहे. मात्र जर तुम्हाला सांगितले की, आजपासून 2100 वर्षांपुर्वी देखील मोबाईलचा वापर केला जात होता, तर तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र रशियातील सिबेरिया येथे पुरात्त्वशास्रज्ञांना अशी गोष्टी सापडली आहे की, तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही.

(Source)

पुरात्त्वशास्रज्ञांच्या एका टीमने 2,137 वर्षांपुर्वीचा एका हाडांचा सापळा शोधला आहे. या हाडांच्या सांगाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे, याच्या जवळ आयफोन सारखी एक वस्तू सापडली आहे. मात्र आयफोन नाहीये. मात्र सांगाड्याजवळ सापडलेली या गोष्टीची बनावट एकदम आयफोन सारखी आहे.

(Source)

या सांगाड्याला पुरात्त्वशास्त्रज्ञांनी नताशा नाव दिले असून, ती प्राचीन फॅशानिस्टा आहे. पुरात्त्वशास्रज्ञांचे म्हणणे आहे की, हा सांगाडा इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकातील आहे. प्राचीन मंगोलियामधील जिओनाग्रू काळातील हा हाडांचा सांगाडा आहे. हा महिलेचा सांगाडा आहे.

(Source)

या महिलेच्या हाडाच्या सांगाड्याडवळ स्मार्टफोन सारखी गोष्ट सापडली आहे. मात्र हा कोणताही स्मार्टफोन नसून, दगडाचा एक भाग आहे. व यामध्ये किंमती दगड बसवण्यात आलेले आहे. या दगडात जे छोट छोटे दगड लावण्यात आले आहेत ते कारेलियन, फेरोजा आणि मोती आहेत. त्यामुळे या दगडाची किंमत आयफोन पेक्षाही अधिक आहे.

Leave a Comment