प्रियंकाने उत्तर दिले महाराष्ट्र पोलिसांच्या त्या ट्विटला

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर यांचा आगामी चित्रपट ‘द स्काय इज पिंक’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर प्रेक्षकांना आवडत आहे. मात्र या ट्रेलरमधील एक डॉयलॉग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एवढेच काय या डॉयलॉगवर महाराष्ट्र पोलिसांनी ट्विट केले आहे.

ट्रेलरमध्ये प्रियंका फरहानला म्हणते की, ‘एक बार आयशा ठीक हो जाए फिर साथ में बैंक लूटेंगे.’ या डॉयलॉगवर महाराष्ट्र पोलिसांनी देखील मजेशीर ट्विट करत फरहान आणि प्रियंकाला एक सख्त वॉर्निंग देखील आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी ट्विट केले की, कलम ३९३ अंतर्गत बँकलुटल्यास सात वर्ष जेल आणि दंड अशी शिक्षा आहे.’

महाराष्ट्र पोलिसांच्या या ट्विटला प्रियंकाने देखील मजेशीर उत्तर दिले आहे. प्रियंकाने लिहिले की, मला रंगेहाथ पकडली गेली असून आता प्लॅन बी तयार करावा लागेल’

फरहानने देखील प्रियंकाचे हे ट्विट रिट्विट करत मजेशीर उत्तर दिले.

महाराष्ट्र पोलिसांनी जागृकता पसरवण्यासाठी केलेले ट्विट नेटिझन्सना चांगलेच आवडले.