अ‍ॅपलकडून वॉच सीरिज 5 आणि नवीन आयपॅड लाँच

कॅलिफोर्नियातील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इव्हेंटमध्ये अ‍ॅपल बहुप्रतिक्षित आयफोन 11 सिरीज लाँच केली. याचवेळी कंपनीने आयपॅड सीरिजमधील नवीन आयपॅड आणि अ‍ॅपल वॉच सीरीज देखील लाँच केला आहे.

अ‍ॅपलच्या या नवीन आयपॅडमध्ये 10.2 इंचचा रेटिना डिस्प्ले मिळेल. याचबरोबर यामध्ये अ‍ॅपलचे ए-10 फ्यूजन प्रोसेसर असेल. या आयपॅडची बॉडी ही 100 टक्के रिसायकल एल्युमिनियमपासून बनवण्यात आलेली आहे.

य  आयपॅडची सुरूवातीची भारतातील किंमत 29,900 रूपये आहे. या किंमतीत 32 जीबी स्टोरेज असलेले वाय-फाय व्हेरिएंट मिळेल. तर वायफाय+सेल्युलर व्हेरिएंटची किंमत 40,900 रूपये आहे. दोन्ही व्हेरिएंट 128 जीबी स्टोरेजमध्ये देखील उपलब्ध असणार आहेत.

यामध्ये फिंगर प्रिंट सेंसर आणि एलटीई सपोर्ट देखील मिळेल. याशिवाय अ‍ॅपल पेन्सिल सपोर्ट असेल. मात्र तुम्हाला या पेन्सिलसाठी 8,500 रूपये अधिक द्यावे लागतील. भारतात या नवीन आयपॅडची विक्री 30 सप्टेंबरपासून सुरू होईल.

कंपनीने अ‍ॅपल वॉच सीरिज 5 देखील लाँच केली आहे. यामध्ये कायम सुरू राहणारा रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. याचबरोबर लोकेशनसाठी नवीन कंप्स फिचर देखील देण्यात आले आहे.

यामध्ये असणारे इमरजेंन्सी कॉलिंग फिचर 150 पेक्षा अधिक देशात काम करेल. हे फिचर फॉल डिटेक्शन वेळी देखील कार्य करेल. हे वॉच एल्युमिनियम, स्टेनलेस स्टील, सेरेमिक आणि टायटेनियम व्हेरिएंटमध्ये असेल. यामध्ये वॉच ओएस 6 मिळेल.

अ‍ॅपल वॉच 5 दोन व्हेरिएंटमध्ये मिळेल. यामध्ये जीपीएस व्हेरिएंटची किंमत 40,900 रूपये आणि जीपीएस+सेल्युलर व्हेरिएंटची किंमत 49,900 रूपये आहे. 10 सप्टेंबरपासून या फोनची प्री-ऑर्डर सुरू होणार असून, 20 सप्टेंबरपासून फोनची विक्री सुरू होईल.