टाटा मोटर्सची शानदार एसयुव्ही लाँच, किंमत रू. 7.57 लाखांपासून सुरू

टाटा मोटर्सने सणाच्या काळात भारतीय ग्राहकांसाठी टाटा नेक्सन क्रॅझ एडिशन भारतात लाँच केली आहे. नेक्सनची 1 लाखांपेक्षा अधिक विक्री झाल्याने कंपनीने ग्राहकांसाठी स्पेशल एडिशन लाँच केले आहे.

दोन व्हेरिएंटमध्ये ही कार लाँच करण्यात आलेली आहे. नेक्सन क्रॅझची किंमत 7.57 लाख रूपये आहे तर नेक्सन क्रॅझ + ची किंमत 8.17 लाख रूपये आहे. 2018 मध्ये देखील कंपनीने नेक्सन क्रॅझचे एडिशन लाँच केले होते.

नेक्सन क्रॅझमध्ये ड्युल टोन रंग (ब्लॅक-सिल्वर) थीम आहे. बॉडीचा रंग काळा आहे तर रूफ सिल्वर टच देण्यात आला आहे. याचबरोबर विंग मिरर्स, अलॉय विल्ज आणि फ्रट ग्रील देखील देण्यात आले आहे.

इंजिनबद्दल सांगायचे तर या एडिशनमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.5 डिझेल इंजिन देण्यात आले आहे. दोन्ही इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड एएमटी गेअरबॉक्समध्ये येतात.

सध्या नेक्सन ही भारतातील एकमेव अशी कार आहे जिला ग्लोबल एनसीपीएकडून 5 स्टार रेटिंग मिळालेली आहे.

Leave a Comment