देसी गर्लच्या बहुप्रतिक्षित ‘द स्काय इज पिंक’चा ट्रेलर रिलीज

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर यांच्या बहुप्रतिक्षित ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. काही दिवसांपुर्वीच टॉरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये या चित्रपटाचा प्रिमिअर पार पडला.

या चित्रपटात प्रियंका चोप्रा आदिती नावाची व्यक्तीरेखा साकारात आहे, तर फरहान तिच्या पतीच्या भुमिकेत आहे. हा चित्रपट मोटिवेशन स्पिकर आयेशा चौधरीची बायोग्राफी ‘माय लिटिल एपिफेनीज’ (My Little Epiphanies) वर आधारित आहे.

झायरा वसीम या चित्रपटात फरहान आणि प्रियंकाची मुलगी आयेशा भूमिकेत आहे. आंकठ प्रेमात बुडालेल्या नवरा-बायकोला आयेशा नावाची मुलगी असते. मात्र नंतर आयेशाला गंभीर आजाराने ग्रासले जाते. नवरा-बायकोचे प्रेम, मुलीच्या आजारपणाचा संघर्ष आणि आनंदात आयुष्य कसे जगावे या सर्व गोष्टी ट्रेलरमध्ये दाखवले आहे.

हा चित्रपट 11 ऑक्टोंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शोनाली बोसने केले असून,फरहान अख्तर, प्रियंका चोप्रा यांच्यासह, झायरा वसीम आणि रोहित सराफ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. झायरा वसीमचा हा शेवटचा चित्रपट आहे. तर 2016 मध्ये आलेल्या ‘जय गंगाजल’ नंतर प्रियंका बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.

Leave a Comment