ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क कॅन्सरशी लढा देत आहे. क्लार्कने काही दिवसांपुर्वीच आपल्या डोक्यावरील स्किन कॅन्सरची सर्जरी केली व फोटो देखील शेअर केला.
कॅन्सरग्रस्त मायकल क्लार्कचा तरूणांना दिला विशेष सल्ला
मायकल क्लार्कला 2006 मध्ये सर्वात प्रथम स्किन कॅन्सर असल्याचे समजले होते. त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्याला हा कॅन्सर आहे. रविवारी मायकल क्लार्कने फोटो शेअर करत माहिती दिली की, त्यांच्या माथ्याची सर्जरी करण्यात आली. क्लार्कची ही चौथी सर्जरी आहे. याआधी त्याच्या चेहऱ्याची देखील सर्जरी करण्यात आलेली आहे.
क्लार्कने फोटो शेअर करत लिहिले की, आणखी एक दिवस, आणखी एक स्किन कॅन्सरची सर्जरी. सर्व युवकांनी लक्षात ठेवा की, सुर्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी योग्य ती काळजी घ्या.
2006 साली देखील मायकल क्लार्कने चेहऱ्याची सर्जरी केली होती. मायकल क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 2015 चा विश्वचषक देखील जिंकला आहे.
