स्टेट बँकेच्या कर्ज आणि मुदत ठेवीवरील व्याजदरात कपात

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) सणांच्या काळात ग्राहकांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. एसबीआयने सोमवारी विविध कालावधीच्या व्याज दरात 0.10 टक्के कपात केली आहे.

एसबीआयने चालू आर्थिक वर्षात तिसऱ्यांदा कपात केली आहे. करण्यात आलेली कपात ही उद्यापासून (10 सप्टेंबर) लागू होणार आहेत.
यासंदर्भात बँकेने म्हटले आहे की, एका वर्षासाठी कपातीनंतर एमसीएलआर व्याज दर हा 8.15 टक्के करण्यात  आला आहे. याआधी व्याज दर हा 8.25 टक्के होता.

याचबरोबर बँकेने रिटेल फिक्स्ड डिपॉजिटवरील व्याजदरात 0.20 टक्क्यांवरून 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. तर ठरावीक मुदत ठेवीवरील व्याजदरात 0.10 ते 0.20 टक्के कपात करण्यात आलेली आहे. बँकेची ही कपात उद्यापासून लागू होईल.

Leave a Comment