Video : अभिषेक बच्चनने घेतली विवेक ओबेरॉयची गळाभेट

एकेकाळी विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअर खुप चर्चा होत असे. मात्र नंतर ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केले. रविवारी एका कार्यक्रमादरम्यान असे काही बघायला मिळाले की, ज्याने सर्वचजण आश्चर्यचकित झाले.

मुंबईमध्ये बँटमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूसाठी आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात बॉलिवूडचे अनेक स्टार उपस्थित होते. या कार्यक्रमास अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन देखील उपस्थित होते. याच कार्यक्रमात विवेक ओबेरॉय देखील वडिल सुरेश ओबेरॉय आणि पत्नी प्रियंकाबरोबर उपस्थित होते. यावेळी विवेक ओबेरॉय आणि बच्चन कुटुंब समोरासमोर आले.

सुरेश ओबेरॉय यांनी बघताच अमिताभ बच्चन यांना मिठी मारली. त्यानंतर अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांनी देखील विवेक ओबेरॉयची गळाभेट घेतली. त्यांचा गळाभेट घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपुर्वी विवेक ओबेरॉयने ऐश्वर्या राय संबंधित विवादास्पद ट्विट देखील केले होते. यामुळे त्यांच्या टीका झाल्यानंतर त्यांनी ट्विट डिलीट केले होते.

Leave a Comment