1100 रूपयात अशी घरी घेऊन जा होंडा डिओ

होंडा कंपनीने आपली शानदार स्कूटर होंडा डिओवर मोठ्या प्रमाणात सवलत जाहीर केली आहे. जर तुम्ही स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही ऑफर तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते.

होंडा डिओच्या इंजिनबद्दल सांगायचे तर यामध्ये सिंगल सिलेंडर 109.19 सीसी इंजिन देण्यात आले आहे. जे 7 हजार Rpm वर 8 Bhp ची पॉवर आणि 5500 Rpm वर 8.91 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर ताशी 83 किमी वेगाने धावते.

रंगाबद्दल सांगायचे तर ही स्कूटर  डॅजल यल्लो मॅटेलिक, मॅट एक्सिस ग्रे मॅटेलिक, मॅट मार्शल ग्रीन मॅटेलिक आणि पर्ल इगनीस ब्लॅक रंगात उपलब्ध आहे.

होंडा डिओची एक्स शोरूम किंमत 53,218 रूपये आहे.  ऑफरबद्दल सांगायचे तर ही स्कूटर 1,100 रूपयांचे डाउन पेमेंट करून खरेदी करू शकता.

या स्कूटरवर नो कॉस्ट ईएमआय ऑफर सुरू आहे. लोनसाठी प्रोसेसिंग फी शून्य रूपये आहे. एकूण 2,100 रूपयांपर्यंतची सवलत तुम्हाला या स्कूटरवर मिळू शकते. याचबरोबर ही स्कूटर पेटीएमद्वारे खरेदी केली तर 7 हजार रूपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो.

 

Leave a Comment