काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून वापरले जात आहेत ‘हे’ कोडवर्ड – अजित डोवाल

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी जम्मू-काश्मीरमधील 92.5 टक्के भूभागावरील निर्बंध हटवण्यात आले असल्याचे सांगितले आहे. तसेच राजकीय नेत्यांविषयी ते म्हणाले की, कोणतीही घटना घडू नये यासाठी त्यांना कोठडीत ठेण्यात आलेले आहे.

त्यांनी सांगितले की, कोणत्याही नेत्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा अथवा देशद्रोहचे प्रकरण नाही. केवळ राज्यात शांतता राहावी यासाठी त्यांना अटक करण्यात आलेली आहे.

अजित डोवाल म्हणाले की, सर्व निर्बंध काढण्याची आमची इच्छा आहे, मात्र हे पाकिस्तानवर अवलंबून आहे. जर पाकिस्तान योग्यरित्या व्यापार करणार नाही आणि घुसखोरी थांबवेल. तसेच आतंकवाद्यांना सिग्नल पाठवणे बंद केले तरच सर्व निर्बंध हटवले जातील.

डोवाल यांनी सांगितले की, भारत-पाकिस्तानच्या सीमेवर 20 किलोमीटर अंतरावर कम्युनिकेशन टॉवर लावण्यात आलेले आहेत.  त्या टॉवरद्वारे पाकिस्तानकडून संदेश पाठवले जात आहेत. आम्ही काही संदेश ऐकले आहेत. यामध्ये सांगितले जात आहे की, सफरचंदानी भरलेले ट्रक कसे पाठवले जात आहेत ? त्यांना राखले जाऊ शकत नाही का ? तुम्हाला काय बांगड्या पाठवू का ? असे कोडवर्ड पाकिस्तानकडून दहशतवाद्यांशी संपर्क साधताना वापरले जात आहेत. या कोडवर्डचा अर्थ अजित डोवाल यांनी सांगितले. पाकिस्तान दहशतवाद्यांशी हत्यार आणि लोजेस्टिकच्या वापराविषयी बोलत आहे.

डोवाल यांनी सांगितले की, श्रीनगरमधून दररोज 750 ट्रक व्यापारासाठी ये-जा करतात. काल दहशतवाद्यांनी प्रसिध्द फळविक्रेता हमीदुल्लाह यांच्या घरात घुसून काम करणाऱ्या दोन मुलांना गोळ्या घातल्या. याचबरोबर अडीच वर्षांची मुलगी आसम जान आणि मुलगा मोहम्मद अरशद यांनाही गोळ्या घातल्या. पाकिस्तान काश्मीरमध्ये अशी परिस्थिती निर्माण करत आहे, जेणेकरून ते आंतरराष्ट्रीय समुहात सांगू शकेल की येथील परिस्थिती भयानक आहे व येथे अशांती आहे.

Leave a Comment