Video : ‘चिटर’ म्हणणाऱ्या प्रेक्षकाला वॉर्नरने दिले असे उत्तर
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरला 2019 चा विश्वचषकमध्ये आणि सध्या सुरू असलेल्या अॅशेस मालिकेत देखील चाहत्यांच्या टिंगलटवाळी आणि असभ्य वर्तनाला सामोरे जावे लागत आहे. मात्र चाहत्यांच्या या टीकेला डेव्हिड वॉर्नरने कधीच महत्त्व दिले नाही.
अशेस मालिकेदरम्यान अशाच प्रकारे प्रेक्षकांनी चिटर म्हणून संबोधले. मालिकेतील चौथ्या सामन्यादरम्यान खेळाडू मैदानावर फिल्डिंगसाठी जाताना चाहत्यांनी त्याची टिंगलटवाळी केली. एक प्रेक्षक ओरडून वॉर्नरला चिटर म्हणून डिवचत होता. मात्र यावेळी वॉर्नरने दिलेल्या उत्तराने सगळ्यांचीच मने जिंकली.
#davidwarner #Ashes2019 #ausvseng reaction 😂😂😂😂👌 pic.twitter.com/c3kicg4xH0
— maaz (@dizismaaz) September 7, 2019
त्या प्रेक्षकावर अजिबात न चिडता वॉर्नरने केवळ दोन्ही हात वर करून त्याच्याकडे बघत हसला आणि निघून गेला. डेव्हिड वॉर्नरने अशाप्रकारे दिलेले उत्तर सगळ्यांनाच आवडले.
यंदाच्या अशेस मालिकेत वॉर्नर खास कामगिरी करू शकलेला नाही. त्याने सात डावात 2, 8, 3, 5, 61, 0 आणि 0 अशा धावा केलेल्या आहेत.