यामुळे बदलले रात्रीस खेळ चालेमधील शेवंताचे रूप


सध्या बऱ्याच घटना ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत घडत असून अण्णा नाईक चक्क तुरुंगात आहेत. अशात त्यांना तुरुंगात भेटायला शेवंता जाते.

अण्णा शोभाला गोळी मारल्यामुळे तुरुंगात आहेत. अण्णांना तुरुंगात वेगवेगळे भास होत आहेत. त्यातच प्रेक्षकांना स्क्रीनवर शेवंता दिसते. अण्णांनी गर्भपाताचे औषध शेवंताला दिल्याने तिच्यावर परिणाम झाला. ती कुरूप दिसायला लागली. पण आता प्रेक्षकांना तिचे बदलेले रूप म्हणजे पाहून आश्चर्य वाटते.

अण्णांना भेटायला शेवंता तुरुंगात येते, हा भास आहे. तो अण्णांनाच होत आहे. आपल्या घरातील कोणी भेटायला आले नाहीत म्हणूनही अण्णा चिडले आहेत. दुसरीकडे शेवंताचा नवरा पाटणकर आपल्या आजारी बायकोची सेवा करत असल्यामुळे शेवंताला आता आपल्या वागण्याचा पश्चात्ताप होत आहे.

Leave a Comment