पावसाळ्यात या 5 सोप्या ट्रिक्स वापरुन वाळवा कपडे


पावसाळी वातावरणात आपले ओले कपडे बाहेर वाळत घालता येत नाहीत आणि आपल्या समोर धुतलेले कपडे लवकर सुकवायचे कसे हा मोठा प्रश्न असतो. पावसाळ्यात दमट हवा असते, आपण त्यात घरातच कपडे वाळत घालतो. त्यामुळे कपडे वाळायला वेळ लागतो. एखादा छोटा स्टँड अशा वेळी विकत घेतला तर बराच त्रास कमी होईल.

घरातील त्यातल्या त्यात हवेशीर जागी कपड्याचा स्टँड ठेवा. यावर जीन्ससारखे सर्वांत जाड कपडे एका बाजूला वाळत घाला. कपडे घट्ट पिळून, व्यवस्थित झटकूनच वाळत घाला. घट्ट पिळताना नाजूक कपडे खराब होणार नाहीत, याची मात्र काळजी घ्या.

थोडा वेळ का होईना पण कपड्याचा स्टँड पंख्याखाली ठेवा. यामुळे कपडे लवकर वाळायला मदत होईल. पुरेसे अंतर दोन कपड्यांमध्ये ठेवा आणि कपड्याची बाजू काही तासांनी बदलत राहा. यामुळे कपड्यांमध्ये दमटपणा राहणार नाही. कपडे लवकर वाळावेत म्हणून काही जण त्यावरून गरम इस्त्री फिरवतात. पण हा उपाय धोकादायक आहे. यातून कपडे खराब होऊ शकतात आणि शॉक बसू शकतो.

Leave a Comment