सिल्वेस्टर स्टॅलोनच्या ‘रॅम्बो – लास्ट ब्लड’चा ट्रेलर रिलीज


या महिन्याच्या २० तारखेला सिल्वेस्टर स्टॅलोनचा आगामी ‘रॅम्बो’ चित्रपट रिलीज होणार आहे. रॅम्बो सिरीजचा पाचवा आणि शेवटचा भाग आता प्रदर्शनासठी सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याचबरोबर चित्रपटाचे नवीन पोस्टर देखील रिलीज करण्यात आले आहे.


स्टॅलोनच्या ‘फर्स्ट ब्लड’ या रॅम्बो सिरीजमधील पहिल्या चित्रपटाने इतिहास रचला होता. त्यानंतर त्याचे साहस पाहण्याची प्रेक्षकांना सवयच लागली होती. या सिरीजचा पाचवा भाग आता येत असून याचे शीर्षक आहे ‘रॅम्बो – लास्ट ब्लड’. भारतात हा चित्रपट २० सप्टेंबर २०१९ मध्ये रिलीज होईल. ‘रॅम्बो – लास्ट ब्लड’चे वितरण पीव्हीआर आणि एमव्हीपी एंटरटेन्मेंटच्यावतीने होणार आहे.

चित्रपटाचे नवीन पोस्टर ट्विटरवर ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी शेअर केले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरची सध्या जगभर चर्चा सुरू आहे. भारतात हा चित्रपट हिंदी, तेलुगु, तामिळ आणि इंग्रजी भाषेत रिलीज होणार आहे.

Leave a Comment