व्हायरलः तुरुगांतच डॉनने साजरा केला वाढदिवस


कारागृहाबाहेर मोठे प्रश्न आहेत. महागाई वाढत आहे. रोजगार उपलब्ध नाही. 20-20 हजारांचा दंड रस्त्यावर वसूल केला जात आहे. पण कारागृहात कोणतीही समस्या नाही. सर्व चांगले आहे आत पार्टी करा, मजा करा, दारु पिया, फोन करा, आपल्याला आवडत असल्यास व्हिडिओ तयार करा आणि मग अशी काळजी करू नका की आपला वाढदिवस तुरुगांतच साजरा करावा लागेल. कारण आता तुरुंगातही वाढदिवसाची पार्टी सुरू झाली आहे. बिहारमध्ये अशा कारागृहातील काही छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.

आपल्या मुळशी पॅटर्नमधील भाईचा बर्थडे हे गाणे चांगलेच आठवत असेल, त्याच गाण्याचा प्रत्यय आला आहे. या मित्रांनी जेलमध्ये असलेल्या डॉनला आई बाबाची उणीव भासू दिली नाही. दोन व्हॅनिला केक सजवले. डॉनने चेक्स शर्ट घातला होता. त्याचबरोबर कपाळावर टिळा लावला. त्याचबरोबर एकमेकांच्या शेजारी उभे असलेले लोक हॅपी बर्थडे टू यू असे सुर देखील आळवत होते. हे बर्थडे सेलिब्रेशन कोणत्या क्लब किंवा हॉटेलमध्ये नव्हेतर छपरा जिल्ह्यातील कारागृहात करण्यात आले. या सेलिब्रेशनचे फोटो समोर आले आहेत.