या कंडोम कंपनीने हटके जाहिरातीतून दिला वाहतूक नियम पाळण्याच्या सल्ला


सध्या देशभरात नवीन वाहतूक नियम हा चर्चेचा मुख्य विषय बनत असून मोटार वाहतूक कायद्यातील दुरुस्ती सादर करत केंद्र सरकारने 1 सप्टेंबर पासून नवे नियम जारी केले होते. रस्ते व वाहतूक सुरक्षेला धाब्यावर बसवणाऱ्यांना रोख लावण्यासाठी या नियमांनुसार दंड व शिक्षेत बरीच वाढ केली होती. या नियमासाठी विविध स्तरावरून संमिश्र प्रतिक्रिया समोर येत होत्या.


ड्युरेक्स कंडोम कंपनीने देखील आता सरकारच्या या नव्या धोरणाची पाठराखण करत एक मजेशीर जाहिरात शेअर केली आहे. ‘Ride Safe’ हा हटके मॅसेज यामधून देण्यात आला आहे. तुमची एक छोटीशी चूकही तुम्हाला मोठा दंड भरायला लावू शकते या स्वरूपात ही जाहिरात आहे. त्याचबरोबर फसव्या चुका टाळा असे म्हणत ही जाहिरात ड्युरेक्सने शेअर केली आहे. नेटकऱ्यांनी देखील ड्युरेक्सच्या या हटके व क्रिएटिव्ह पद्धतीची स्तुती केली आहे. तर यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने हा संदेश देताच आला नसता असे म्हणत काहींनी प्रशंसा केली आहे.

आता ही जाहिरात बघून जरी आपण वाहतुक नियमांशी संबंध जोडत असलो तरी, ड्युरेक्सने यामागे आपल्या ब्रॅण्डची देखील प्रसिद्धी केली आहे. रस्त्यात सुरक्षित ड्राइव्ह करणे ज्याप्रमाणे गरजेचे आहे त्याप्रमाणे कंडोम वापरून सुरक्षित सेक्स करा असा छुपा अजेंडा आहे.

Leave a Comment