ऋतिक-टायगरच्या वॉरमधील पहिले गाणे रिलीज


काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचे दोन हँडसम हंक ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांची जबरदस्त केमिस्ट्री आणि भन्नाट अॅक्शन असलेल्या ‘वॉर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटात या दोघांसोबत अभिनेत्री वाणी कपूर झळकणार आहे. डान्सच्या बाबतीत हे तिघेही अव्वल असल्यामुळे त्यांचा या चित्रपटातील डान्स किंवा गाणे कधी पाहायला मिळेल यांची उत्सुकता सर्व प्रेक्षकांना लागली होती. या चित्रपटातील पहिले गाणे अशा चाहत्यांसाठी रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे ‘घुंगरु’ असे बोल असून ऋतिक आणि वाणीची जबरदस्त केमिस्ट्री यात पाहायला मिळत आहे.

कुमार यांनी हे गाणे लिहिले असून या गाण्याचे विशाल-शेखर ही जोडी संगीतकार आहेत. तर अरिजीत सिंह आणि शिल्पा राव यांनी हे गाणे गायले आहे. येत्या 2 ऑक्टोबरला सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘वॉर’ हा चित्रपट सर्वत्र रिलीज होणार आहे. यात वाणी कपूरचा हॉट लूक पाहून तिची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आशुतोष राणा, विनय पाठक हे देखील यशराज फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग हे सीन पोर्तुगालची सर्वात उंच टेकडीवर ‘सेरा दा एस्ट्रेला’ येथे चित्रित करण्यात आले आहे.

Leave a Comment