भारतापेक्षा स्वस्त पेट्रोल ‘या’ दहा देशांमध्ये मिळते


कच्च्या तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी झाल्या असल्यातरी भारतावर त्याचा काहीएक परिणाम झालेला नाही. डॉलरमागे पडलेली रुपयाची किंमत हे यात कारण असू शकते. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर आजही असे अनेक देश आहेत, ज्यामध्ये पेट्रोलचे दर खुप कमी आहेत.

अझरबैजान जगात सर्वात स्वस्त किमतीत तेल विकणाऱ्या टॉप-10 देशांमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे. 33.87 रुपये प्रति लीटर या देशात पेट्रोलची किंमत आहे.

दक्षिण आफ्रिकेतील अंगोला या देशाचा या यादीत नववा क्रमांक लागतो. 31.90 रुपये प्रति लीटर या देशात पेट्रोलची किंमत आहे. भारताच्या तुलनेत या देशात पेट्रोल तब्बल 42.96 रुपये स्वस्त आहे.

तुर्कमेनीस्तान या देशाचा आठवा क्रमांक लागतो. 30.87 रुपये प्रति लीटर अशी या देशात पेट्रोलच्या किमत आहे.

नायझेरिया स्वस्त पेट्रोल विकणाऱ्या देशांच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. 28.85 रुपये प्रति लीटर या देशात पेट्रोलची किंमत आहे.

सर्वात स्वस्त पेट्रोल विकण्यात जगात इरान हा देश सहाव्या क्रमांकावर आहे. इरानमध्ये सध्याच्या घडीला 25.99 रुपये प्रति लीटर किंमतीत पेट्रोल विकले जाते.

अल्जीरिया स्वस्त पेट्रोल विकणाऱ्या देशांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. या देशात एक लीटर पेट्रोलची किंमत 25.12 रुपये आहे.

चौथ्या क्रमांकावर तेलाचा देश या नावाने प्रसिध्द असलेला कुवैत हा देश यादीत आहे. येथे एक लीटर पेट्रोल 24.91 रुपयांना मिळते. ही किंमत भारताच्या तुलनेत 49.95 रुपये जास्त आहे.

सुडान या देशाचा तिसरा क्रमांक लागतो. सुडानमध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत फक्त 9.87 रुपये आहे.

दुसऱ्या क्रमांकावर सर्वात स्वस्त पेट्रोल असलेल्या देशांच्या किंमतीत क्यूबा देश आहे. क्युबामध्ये सध्या पेट्रोलचे दर 6.50 रुपये आहे.

व्हेनेजुएला या यादीत सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे. तुम्ही विचारही करू शकत नाही, एवढी कमी किंमत या देशात आहे. या देशात पेट्रोलची किंमत प्रती लिटर चक्क 4 पैसे आहे.

Leave a Comment