अभिनेता राहुल बोस याला काही दिवासांपूर्वी अवघ्या 2 केळ्यांसाठी 442 रुपये मोजवे लागले होते. तसेच एका प्रसिद्ध अभिनेत्रीला जेवणात कीडे सापडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता असेच काहीसे टीव्ही वरील प्रसिद्ध कॉमेडियन कीकू शारदा सोबतही घडले आहे. एक कप चहा आणि एक कॅपचीनो कॉफीसाठी कीकूला तब्बल 78,650 रुपये मोजावे लागले. कीकूने या बिलाचा फोटो त्याच्या ट्विटर हँडलवर शेअर केला. त्याच्या या ट्विटची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.
अभिनेत्याला तब्बल 78 हजारांना पडली एक चहा
त्याच्या या बिलाचा फोटो कीकूने सोशल मीडियावर शेअर केला आणि याविषयीची पूर्ण माहिती सुद्धा शेअर केली आहे. कीकूने लिहिले, एका कॅपचीनोसाठी मला हजारोंचे बिल भरावे लागले, पण त्याची मी तक्रार करत नाही आहे. कीकूला भराव्या लागलेल्या बिलानुसार एक गरम चहासाठी 30000 आणि एका कॅपचीनोसाठी 35000 आणि सर्व्हिस चार्ज 13650 रुपये वसूल करण्यात आले.
कीकूने या सर्व प्रकारानंतर याविषयी तक्रार न करण्याबद्दल लिहून काही दिवसांपूर्वी अभिनेता राहुल बोससोबत घडलेल्या प्रकरणाचीही ठवण करुन दिली. भारतातील एका 5 स्टार हॉटेलने दोन केळ्यांसाठी राहुल कडून 442 रुपये वसुल केले होते. पण कीकूने याविषयी तक्रार न करण्यामागे एक वेगळचे कारण आहे.
My bill for 1 cappuccino and 1 tea is 78,650/- ,,,,,,, but I am not complaining 😜 as I am in Bali , Indonesia and this amount in their currency converts to ₹ 400/- in Indian currency #mehengaayee pic.twitter.com/rB6U6YgVnN
— kiku sharda (@kikusharda) September 3, 2019
कीकूसोबत घडलेला हा प्रकार भारतातील नसून परदेशातील आहे. कीकू सध्या बाली इंडोनेशियामध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. आता सर्वांनाच माहित आहे, इंडोनेशियाचे चलन हे भारताच्या रुपयाच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे अनेकजण परदेशी टूरसाठी इंडोनेशियाचा पर्याय निवडतात.
कीकूने त्याच्यासोबत घडलेल्या या प्रकाराचा खुलासा केला. त्याने सांगितलं, बालीच्या 78,650च्या बिलाचे भारतीय रुपयांत रुपांतर केले तर ते 400 रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे आपण चहाच्या किंमतीबाबत तक्रार करत नसल्याचे कीकूने स्पष्ट केले आहे.