तुम्ही तरी ओळखाल काय अभिनेत्रीला ?


केदारनाथ आणि सिम्बा चित्रपटाद्वारे सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगा सारा अली खानने तिचे बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर सारा खूप सक्रिय असते. सध्या तिने शेअर केलेला एक Throw back फोटो व्हायरल झाला आहे. साराला या फोटोत ओळखणे कठीण जात आहे कारण ती या फोटोत एवढीलठ्ठ दिसते आहे. तिने स्वतःच या फोटोला Throw back to when I couldn’t be thrown अशी कॅप्शन दिली आहे. सारा आई अमृता सिंग बरोबरच्या या फोटोत चांगलीच जाड दिसते आहे. आत्ताची सारा आणि तेव्हाची सारा यात प्रचंड फरक झालेला दिसतो. तिने मागे दिलेल्या एका मुलाखतीत साराने आपले वजन 96 किलो असल्याचे सांगितले होते.

सारा अली खानचा जवळचा मित्र आणि ज्याच्याबरोबर सध्या तिचे नाव जोडले जाते तो म्हणजे अभिनेता कार्तिक आर्यन यानेसुद्धा तिच्या या Throwback pic वर कमेंट केली आहे. सारा अली खानसारखी ही मुलगी दिसत असल्याचे त्याने गमतीत म्हटले आहे. यावर अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही कमेंट करून साराचे Hats off म्हणत कौतुक केले आहे. तुझा हा फिटनेसचा प्रवास किती आव्हानात्मक असेल असे श्रद्धाने लिहिले आहे.

आपल्या अभिनयासोबतच आपल्या ड्रेसिंग सेन्ससाठी अभिनेत्री सारा अली खान प्रसिद्ध आहे. पण साराचा लॉ स्टुडंट ते अभिनेत्री हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. पहिल्या दोन्ही चित्रपटांत स्लीम ट्रीम दिसणारी सारा काही वर्षांपूर्वी तुम्ही पाहिली असती तर ही सारा अली खान आहे यावर कोणाचाच विश्वास बसला नसता. साराचे वजन चित्रपटात येण्यापूर्वी 96 किलो होते. पण आपले अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला जिममध्ये खूप घाम गाळावा लागला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखातीत साराने तिचा ‘फॅट टू फिट’ प्रवास सांगितला.


साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आपला अभ्यास पूर्ण करावा अशी तिच्या वडीलांची इच्छा होती. सारा कॉलेजमध्ये असताना खूप अभ्यासू होती. खाणे आणि अभ्यास एवढेच तिचे जग होते. न्यूयॉर्कमध्ये ती राहत असताना तिला जंक फूड खाण्याची सवय लागली होती. तिचे वजन ज्यामुळे 96 किलो पर्यंत वाढले. साराने अभ्यासासोबतच जेव्हा तिच्या अभिनेत्री बनण्याच्या स्वप्नाबद्दल विचार करायाला सुरुवात केली त्यावेळी तिला लक्षात आले की, आपल्याला बॉलिवूडमध्ये कोणीही असे स्वीकारणार नसल्यामुळे तिने वजन कमी करायचे ठरवले.

सारा याबाबत सांगते, मी सुरवातीला माझ्या खाण्याच्या वेळांवर नियंत्रण करायला सुरुवात केली. जंक फूड खाणे मी पूर्णपणे बंद केले. मी माझे वजन नियमित व्यायाम, सायकलिंग, बॉक्सिंग याच्या सहाय्याने कमी करायला सुरुवात केली आणि या सर्वात आणखी एक गोष्ट मी केली होती ती म्हणजे मी माझ्या आईला पूर्ण एक वर्ष भेटले नव्हते किंवा तिच्याशी व्हिडिओ कॉल केला नव्हता. मी जेव्हा भारतात परतले तेव्हा मला तिने माझ्या बॅगवरुन ओळखले. माझ्या लुकमध्ये एवढा बदल झाला होता. पण माझ्यासाठी ती खूप आनंदी होती. मी आजही रोज कमीत कमी दीड तास व्यायाम करते.

‘सिंबा’ आणि ‘केदारनाथ’ सारखे सुपरहिट चित्रपट बॉलिवूड पदार्पणातच देणाऱ्या साराला फिल्म फेअरचा बेस्ट डेब्यू अवॉर्ड मिळाला आहे. लवकरच सारा कार्तिक आर्यन सोबत ‘लव्ह आजकल’च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच दिग्दर्शन इम्तियाज अली करत असून हा चित्रपटा 2020मध्ये व्हॅलेंटाइन डेला प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment