आईचा मेणाचा पुतळा पाहून भावूक झाल्या श्रीदेवीच्या मुली


दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या सिंगापूर येथाल मादाम तुसाद संग्रहालयातील मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले असून यावेळी तिचे पती बोनी कपूर आणि मुली जान्हवी आणि खूशी भावूक झाले होते.

नुकताच अभिनेत्री श्रीदेवीचा स्मृतिदिन पार पडला. तिचा मेणाचा पुतळा तयार करून सिंगापूरच्या मादाम तुसाद म्युझियममध्ये ठेवणार असल्याचे म्युझियमच्या वतीने ठरवण्यात आले होते.

त्यानुसार या पुतळ्याचे नुकतेच श्रीदेवीच्या मुली जान्हवी आणि खूशी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. हा पुतळा श्रीदेवीच्या गाजलेल्या ‘हवाहवाई लूक’ मधील आहे. जान्हवी आणि खूशी दोघी यावेळी आईचा पुतळा पाहून भावुक झाल्या. तर श्रीदेवीचे पती बोनी कपूर हेदेखील तिच्या आठवणीत हरवले.

याशिवाय म्युझियमच्या वतीने श्रीदेवी यांच्या जगभरातील फॅन्सच्या तिच्याबद्दलच्या भावना एकत्रित करून त्याचा एक भव्य कोलाज तयार केला आहे. श्रीदेवीच्या स्मृतीने काही काळ या म्युझियम मधील वातावरण पुरते भारावून गेले.

Leave a Comment