कर्नाटक: सिद्धरामय्या यांनी म्हैसूर विमानतळावर आपल्या सहकार्याला थोबाडावले


म्हैसूर – कर्नाटक कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हैसूर विमानतळावर आपल्या एका सहकाऱ्याला थोबाडावले आहे. ही घटना कॅमेर्‍यात कैद झाली असून त्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण, सिद्धरामय्या यांनी आपल्या सहकाऱ्याला अशी जाहीरपणे का मारहाण केली हे स्पष्ट झाले नाही.

डी. के. शिवकुमार यांना अटक झाल्यापासून कर्नाटकचे राजकारण सध्या गरम झाले आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते सर्वत्र निषेध करीत आहेत. रामनगरमध्ये कार्यकर्त्यांनी कर्नाटक रोडवेजच्या बसला आग लावली तर अनेक बसेसची तोडफोड केली.

तेव्हापासून पोलिसांनी रोडवेज बसेस चालविण्यास बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी रामनगरात रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे.

Leave a Comment