सिंधुच्या बायोपिकमध्ये दीपिकाच्या जागी दिसणार ही अभिनेत्री ?


सध्या बायोपिक चित्रपटांचे वारे बॉलिवूडमध्ये वाहत आहेत. बॉक्स ऑफिसवर गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या मणिकर्णिका, संजू, गोल्ड यांसारख्या चित्रपटांना मिळालेल्या दमदार यशानंतर आणखीन दोन बायोपिक आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही चित्रपट भारताच्या आघाडीच्या बाडमिंटनपटू सायना नेहवाल व पि.व्ही. सिंधूच्या कारकिर्दीवर आधारित असणार आहेत.

अभिनेत्री परिणाती चोप्रा भारताची फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायना नेहवालवरील चित्रपटात झळकणार आहे. पण, अद्याप पी.व्ही. सिंधूची भूमिका कोण साकारणार हे स्पष्ट झालेले नाही. गेल्या वर्षभरापासून अभिनेत्री दीपिका पादुकोण पी.व्ही. सिंधूच्या बायोपिकसाठी जोरदार तयारी करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. परंतु या चित्रपटासाठी आता आणखीन एका नवीन अभिनेत्रीचे नाव पुढे येत आहे. दीपिकाच्या जागी या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्कीनेनी हिची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

समंथाने आजवर थेरी, कथ्थी, ईगा, रंगस्थलम यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाचे प्रदर्शन केले असून ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. पी.व्ही सिंधूशी मिळतीजुळती अशी चर्चेत असलेल्या समंथाची देहबोली असल्यामुळे त्यामुळे दीपिका पादुकोणच्या जागी समंथा योग्य ठरेल असे तिच्या चाहत्यांचे मत आहे. सध्या बी.व्ही. रेड्डी दिग्दर्शित ‘ओ बेबी’ या तेलुगु चित्रपटाच्या चित्रीकरणात समंथा व्यस्त असल्यामुळे पी.व्ही. सिंधूवरील चित्रपटाबाबत तिने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण चाहते मात्र समंथाचे बॉलिवूडमधील पदार्पण पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Leave a Comment