‘या’ 3 गाड्या एकदा चार्ज केल्यावर धावणार 200 किमी


लवकरच तीन बजेट कार एका वर्षाच्या आत लाँच करण्यात येणार असून यांची निर्मिती भारतातील वेगवेगळ्या कार कंपन्यांनी केली आहे. भारतात आतापर्यंत लाँग रेंज इलेक्ट्रिक कारमध्ये ह्यूंडाईच्या कोना कारचा देखील समावेश झाला आहे. आता वर्षभरात तीन कार लाँच होणार आहेत.

50 इलेक्ट्रीक प्रोटोटाइप या मॉडेलवर मारुती सुझुकी काम करत आहे. लवकरच ते इलेक्ट्रीक कार लाँच करण्याची शक्यता आहे. याबद्दल कंपनीने अद्याप घोषणा केलेली नाही. एकदा चार्जिंग केल्यावर ही कार 200 किमीपर्यंत जाईल असे म्हटले जात आहे. पेट्रोल इंजिनची ही कार वॅगन आरसारखीच असेल. या कारची किंमत 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

नुकतेच टाटा मोटर्सने म्हटले की टाटाची नेक्सन एसयुव्ही इलेक्ट्रिक कार पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत बाजारात येईल. कंपनीने या कारबद्दल अद्याप सविस्तर माहिती दिली नसली तरी पेट्रोल कार चार्जिंगवर 250 ते 300 किमीपर्यंत जाऊ शकते. 15 लाख रुपयांपर्यंत याची किंमत असू शकते. अशाच आणखी 3 मॉडेलवरही टाटा कंपनी काम सुरू करणार आहे.

महिंद्रा eKUV100 ही इलेक्ट्रिक कार लाँच करणार असल्याचे गेल्या वर्षी महिंद्राने म्हटले होते. ही कार यावर्षाच्या अखेरीस बाजारात येऊ शकते. यामध्ये एकदा बॅटरी चार्जिंग केल्यानंतर 140 किमीपर्यंत कार धावू शकते. तासाभरात ही बॅटरी 80 टक्क्यांहून जास्त चार्ज होते. ही कार 10 लाख रुपयांपर्यंत बाजारात येऊ शकते.

Leave a Comment