
चीनी स्मार्टफोन कंपनी विवोने त्यांच्या व्ही १५ प्रोचा सक्सेसर विवो व्ही १७ प्रो भारतात याच महिन्यात लाँच होणार असल्याचे संकेत दिले आहेत. काही दिवसापूर्वीच हा फोन बिग बॉस टीझर मध्ये दिसला आहे. लिक फोटो इमेजनुसार हा फोन दोन कलर ऑप्शनमध्ये आहे. या फोनला दिला जात असलेल्या ड्युअल फ्रंट कॅमेरा सेट त्याचे वैशिष्ट बनला आहे. या फोनला रिअरला क्वाड म्हणजे चार कॅमेरे दिले गेले आहेत. त्यामुळे हा सहा कॅमेरे असलेला फोन आहे.
ड्युअल फ्रंट कॅमेरा सह विवो व्ही १७ येणार
ड्युअल फ्रंट कॅमेरा सेट असलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. त्यात प्रायमरी सेल्फी कॅमेरा ३२ एमपीचा आहे. रिअरमध्ये चार कॅमेरे असून त्यातील प्रायमरी ४८ किंवा ६४ एमपीचा असू शकेल असे सांगितले जात आहे. क्वाड कॅमेरा सेटअप मध्ये एलइडी फ्लॅश दिला गेला आहे. या फोनची बाकी फिचर समजलेली नसली तरी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह हा फोन येईल आणि त्याची किंमत साधारण ३० हजार रुपयांचा आसपास असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
