या पायलटच्या संग्रही ११० लढाऊ विमाने


दोन देश जेव्हा एकमेकांची पंगा घेण्याच्या विचारात असतात तेव्हा सर्वप्रथम आपल्या शेजारी देशाचे लष्करी सामर्थ्य विचारात घेतात. देशाच्या लष्करी सामर्थ्यात हवाई दलाची भूमिका महत्वाची असते. लढाऊ पायलट म्हणून निवृत्ती घेतलेल्या फ्रांसच्या बिओने टाऊन मधील ८७ वर्षीय मिशेल पोन्त याच्या संग्रही जगातील सर्वात मोठा खासगी लढाऊ विमानांचा संग्रह आहे. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्या ताफ्यात जितकी लढाऊ विमाने आहेत त्याच्यापेक्षा जास्त विमाने मिशेल यांच्या संग्रही आहेत.

ग्लोबल फायर इंडेक्स २०१९ नुसार बांगलादेशाकडे असलेल्या लढाऊ विमानांची संख्या ९० तर श्रीलंकेकडे ७६ लढाऊ विमाने आहेत. त्यात हेलिकॉप्टर्सचाही समावेश आहे. मिशेल पोन्त यांच्या संग्रही ११० लढाऊ विमाने असून त्यात नुकतीच अमेरिकन एफ १६ विमानाची भर पडली आहे. ही सर्व विमाने त्यांनी गार्डन मध्ये ठेवली असून त्यातील एकही उड्डाण करण्याच्या परिस्थितीत नाही. या प्रचंड संग्रहामुळे मिशेल यांचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदले गेले आहे.


मिशेल स्वतः पायलट म्हणून निवृत्त झाला आहे. त्याच्या या अद्भुत संग्रहालयाला दरवर्षी किमान ४० हजार पर्यटक भेट देतात. त्यातून होणाऱ्या कमाईततून मिशेल नवीन लढाऊ विमाने खरेदी करतो. या प्रकारे त्याच्या संग्रहातील विमानांची संख्या वाढत चालली आहे. १९८० पासून त्याने विमाने जमाविण्याची सुरवात केली. त्यातील पहिले विमान त्याला रेस जिंकल्याचे बक्षीस म्हणून मिळाले होते.

त्याच्या संग्रही रशियन मिग २१, ब्रिटीश मूळ असलेले सिंगल इंजिन डी एच ११२ व्हेनोम, सिंगल सीट सिंगल इंजिनचे डसोल्ट मिराज थ्री अशी विमाने आहेत.

Leave a Comment