‘पृथ्वीराज चौहान’मध्ये मानुषी छिल्लर साकारणार संयोगिताची भूमिका


अक्षय कुमारच्या आगामी बिग बजेट ‘पृथ्वीराज चौहान’ चित्रपटातील कलाकारांची निवड झाली असून अक्षय या चित्रपटात पृथ्वीराज यांची भूमिका साकारणार आहेत. यात मानव वीज मोहम्मद गोरची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट पृथ्वीराज यांच्या पराक्रमावर आधारित असणार आहे. तरी यात प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात येणार आहे. पृथ्वीराज आणि कनौजची राजकुमारी संयोगिताची प्रेम कथा दाखवली जाईल. पृथ्वीराज यांच्या दरबारातील कवी चांद बरदाईने या प्रेमकथेविषयी त्यांच्या कादंबरीत लिहिले होते.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरची संयोगिताच्या भूमिकेसाठी निवड झाली आहे. पृथ्वीराजच्या चार पत्नी होत्या असेही बोलले जाते. पण फक्त दोनच पत्नी चित्रपटात दाखवल्या जातील. संयोगिता पहिली पत्नी असेल तर दुसरी पत्नीच्या भूमिकेसाठी एखादी टीव्ही अभिनेत्री घेतली जाईल. तिचे फक्त ४ ते ५ दृश्य असतील. शूटिंग राजस्थान आणि उत्तर भारताच्या इतर राज्यात होणार आहे.

Leave a Comment