आता रुपेरी पडद्यावर झळकणार रानू मडंल यांचा बायोपिक


व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे एका रात्रीत प्रकाशझोतात आलेल्या रानू मंडल यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती होत असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भातील एका वृत्तानुसार प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक ऋषिकेश मंडल रानू मंडल यांच्या आयुष्यावर तयार होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण्यासोबतच ते याचे दिग्दर्शनही करतील. या चित्रपटाच्या शूटिंगला या महिन्यातच सुरुवात होणार असल्याचे वृत्त आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रानू मंडल आणि गायक सिद्धार्थ राय चित्रपटामधील काही गाण्यांना आपला आवाज देतील.

चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते फिरोज खान यांच्या घरी यापूर्वी रानू काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्या फिरोज खान यांच्या घरी राहून स्वयंपाक करण्यापासून ते साफसफाईची कामे करत होत्या. तसेच फिरोज खान यांचा अभिनेता मुलगा फरदीन खान व दिग्दर्शक भाऊ संजय खान यांची कामेही त्या करत होत्या.

Leave a Comment