मला शोभेल असे काम आणि लोकहिताच्या अटी मान्य झाल्यास भाजप प्रवेश


सातारा : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भासले यांच्या भाजप प्रवेशाच्या जोरदार चर्चा सुरू असून त्यांचा भाजप प्रवेश हा जवळजवळ निश्चित मानला जात आहे. पण त्यांनी आतापर्यंत यावर थेट भाष्य करणे टाळले होते. पण आज अखेर त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे उदयनराजेंची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार अमोल कोल्हेंना पाठवले आहे. अमोल कोल्हे आणि उदयनराजेंची प्रदिर्घ चर्चाही झाली. पण उदयनराजेंचे त्यातून ही समाधान झाल्याचे दिसत नाही.

यावर उदनराजे भोसले म्हणाले, माझ्या अटींवर मी प्रवेश करेन. मी काय करावे हे कुणी दुसरे सांगू शकत नाही. मला काय करायचे ते मी ठरवणार आहे. मला शोभेल असे आणि लोकहिताच्या अटी मान्य झाल्यास मी भाजप प्रवेशाचा निर्णय घेईन. शेतकऱ्यांसाठी विमा योजनेची अट आहे. मी कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती. त्यांनी ठरवावे आणि मला सांगावे. जायचे असेल तर हो, नसेल तर नाही. उद्योग बंद पडत आहेत. त्यांना पुन्हा कसे सुरू करता येईल, यावर विचार करावा लागेल. अन्यथा दिवाळखोरीची वेळ भारतावर येईल. आपण पैसे कोठून आणणार? सगळी सोंगे आणता येतील पण पैशाचे सोंग आणता येणार नसल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.

Leave a Comment