आनंद महिद्रांनी यामुळे उदयपुरच्या युवराजांना दिली लाखमोलाची थार 700


उदयपुरचे युवराज लक्षराज सिंग मेवर यांना महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी आपल्या कंपनीची थार 700 ही गाडी दिली असून थार ७०० या गाड्यांची निर्मिती महिंद्रा अॅण्ड महिंद्राने बंद केली आहे. उदयपुरच्या युवराजांना त्यापैकीच शेवटची गाडी महिंद्रांनी भेट दिली आहे. ९ लाख ९९ हजार एवढी या गाडीची किंमत आहे.


गाड्यांची उदयपूरमधील राजघराणे असलेल्या मेवार कुटुंबाला आवड आहे. त्यांनी याच आवडीमधून २० वर्षांपूर्वी शहरामध्ये गाड्यांचे संग्रहालय स्थापन केले असल्याचे कारटॉक या वेबसाईटने आपल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. जून महिन्यात थार 700 या गाडीची उत्पादन बंद करणार असल्याची माहिती महिंद्रा अॅण्ड महिंद्राने दिली.

१९४९ साली २ हजार ७० कोटी अमेरिकन डॉलर एवढा मोठा कारभार असणाऱ्या महिंद्रा कंपनीची सुरुवात झाली. या गाडीची निर्मिती कंपनीने तेव्हापासून सुरु केली होती. कंपनीच्या ७० वर्षांच्या वाटचालीची ही गाडी साक्षीदार राहिली आहे. पण जूनमध्ये या गाडीचे शेवटचे 700 गाड्यांचे युनिट तयार करण्यात आले. याच युनिटमधील शेवटच्या गाडीची चावी महिंद्रांनी उदयपुरच्या युवराजांना दिली. यासंदर्भातील माहिती महिंद्रा आणि युवराज दोघांनीही ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

Leave a Comment