
आजही अनेकदा आपण लांबच्या प्रवासासाठी रेल्वे हा पर्याय निवडत असतो. अनेक जण रेल्वेचे एसी तिकीटाच्या किंमतीत विमानाचे तिकीट येते म्हणून विमानाने देखील प्रवास करतात. मात्र असे असले तरी देखील रेल्वेने प्रवास करण्यात एक वेगळीच मजा असते. भारतात अनेक लग्जरी रेल्वे आहेत, ज्याचा तुम्ही एकदा प्रवास कराल तर आयुष्यभर लक्षात ठेवाल. आज आपण अशाच लग्जरी रेल्वेविषयी जाणून घेऊया.

द डिजर्ट क्वीन (जोधपूर-जैसलमेर)
जर तुम्ही लग्जरी प्रवासासाठी थोडे अधिक पैसे खर्च करण्यास तयार असाल तर तुम्ही नक्कीच डिजर्ट क्वीनचा प्रवास करायला हवा. ही रेल्वे राजस्थानच्या जोधपूर ते जैसलमेर या मार्गावर धावते. या रेल्वेमध्ये बसताच तुम्हाला वाइनचा ग्लास, चवदार जेवण आणि बऱ्चाच गोष्टी दिल्या जातात.

द महाराजा एक्सप्रेस (मुंबई-दिल्ली)
द महाराजा एक्सप्रेस ही खऱ्या अर्थाने लग्जरी ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये तुम्हाला, एक मोठी डायनिंग रूम, बार, लाँज, एलसीडी टिव्ही, इंटरनेट सुविधा, मस्त बाथरूम, मोठ-मोठ्या खिड्या पहायला मिळतील.

द हिमालया क्वीन (कल्का – शिमला )
तुम्हाला जर प्रवासाचा हटके अनुभव घ्यायचा असेल तर या रेल्वेचा नक्की प्रवास करावा. द हिमालयन क्वीन ही टॉय ट्रेन आहे. एडवेंचर्ससाठी या रेल्वेचा नक्कीच प्रवास करावा.

पॅलेस ऑन वील्स (राजस्थान)
या रेल्वेचा जगभरातील टॉप लग्जरी रेल्वेमध्ये समावेश होता. गेली 35 वर्षांपासून ही रेल्वे सेवा देत आहे. भारतातील लग्जरी रेल्वेंसाठी ही रेल्वे एक खास बेंचमार्क आहे.
एकदा तरी करा भारतातील या शाही ट्रेनने प्रवास
दार्जिलिंग हिमालय रेल्वे (जलपाइगुरी-दार्जिलिंग)
चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या उंचच उंच टेकड्या, त्यावरील हिरवळ आणि धुके असे चित्र तुम्ही अनेकदा पाहिलेच असेल. मात्र या रेल्वेमध्ये प्रवास करताना ते दृष्य आपल्या डोळ्यासमोर असते. कवी, चित्रपट दिग्दर्शक, प्रवासी अनेकांना या रेल्वेनी आणि या दृष्याने भूरळ घातली आहे.

मांडवी एक्सप्रेस (मांडगाव-मुंबई)
सह्याद्री पर्वत रांगा आणि अरबी समुद्राचे सुंदर दृष्य पाहण्यासाठी मांडवी एक्सप्रेसने नक्कीच प्रवास करायला हवा.
द गोल्डन चॅरिअट (बैंग्लोर-गोवा)
द गोल्डन चॅरिअट ही कर्नाटकची शान आहे. हम्पी येथील आर्किटेक्चरवरून द गोल्डन चॅरिअट हे नाव या रेल्वेला देण्यात आले आहे. या ट्रेनमधील 19 डब्ब्यांना वेगवेगळ्या पध्तीने सजवण्यात आलेले आहे. यामध्ये स्पा, बार, लाँज आणि कॉन्फ्रेंस रूमची सुविधा देखील मिळते.

आयलँड एक्सप्रेस (कन्याकुमारी – त्रिवेंद्रम)
कन्याकुमारी ते त्रिवेंद्रम या तीन तासांच्या प्रवासासाठी आयलँड एक्सप्रेस उत्तम पर्याय आहे. निळ्याशार समुद्रातून जाणारी रेल्वे डोळ्यांना आनंद देऊन जाते.
