जाणून घेऊ या अंटार्क्टिका बद्दल काही रोचक तथ्ये

Antarctica
पृथ्वीवरील दक्षिण ध्रुव हा शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांसाठी आणि मोठा रुचीचा विषय ठरत आला आहे. अंटार्क्टिका प्रांताचे नाव ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो पांढऱ्या शुभ्र हिमाने आच्छादलेला प्रदेश. पण या शिवाय देखील अंटार्क्टिका प्रांताशी निगडित अनेक रोचक तथ्ये आहेत. ‘अंटार्क्टिका’ हा ग्रीक शब्द असून, याचा अर्थ ‘ज्या ठिकाणी अस्वले नाहीत अस प्रदेश’,( land without bears) असा आहे. या ठिकाणी पोलर बेअर्स पहावयास मिळत नाहीत हे खरे आहेच, पण ‘बेअर्स’ याचा संबंध ‘द ग्रेट बेअर’, म्हणजेच आकाशामध्ये दिसणाऱ्या सप्तर्षी या तारा समूहाशी आहे. या तारा समूहाला इंग्रजीमध्ये ‘ग ग्रेट बेअर कॉस्टीलेशन’ म्हटले जात असून, हा तारासमूह केवळ उत्तर गोलार्धामध्ये दृष्टीस पडतो. त्यामुळे या प्रदेशाला ‘land without bears’ म्हटले जाते.
Antarctica1
संपूर्ण अंटार्क्टिका प्रांत हा हिमाच्छादित असून, बहुतेक ठिकाणी बर्फाच्या चादरीची घनता एक मैलापासून २.९६ मैलांवर आहे. हा प्रदेश इतक्या मोठ्या प्रमाणावर हिमाच्छादित असल्याने मानवी जीवन येथे कठीण आहे. जगातील एकूण बर्फाच्छादित प्रदेशापैकी नव्वद टक्के प्रदेश अंटार्क्टिकामध्ये आहे. जर या प्रदेशातील सर्व बर्फ कधी वितळला, तर सर्व महासागरांमधील पाण्याची पातळी साठ मीटर्सनी वाढेल ! अंटार्क्टिका प्रांतामध्ये मानवी जीवनच काय, प्राणीजीवनही मोठ्या मुश्किलीने आढळते. या प्रांतातील सर्वात मोठा प्राणी ‘बेल्जीका अंटार्क्टिका’ य नावाने ओळखला जात असून, या प्राण्याची लांबी केवळ २ मिलीमीटर आहे. अधून मधून या ठिकाणी पेंग्विन्स आणि सील्स दिसत असले, तरी हे तेथील कायमस्वरूपी निवासी नाहीत.
Antarctica2
या प्रांतामध्ये ‘ब्लड फॉल्स’ नामक पाण्याचा झरा असून, या झाऱ्याच्या पाण्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त आहे. हे पाणी झऱ्यातून खाली पडत असताना हवेच्या संपर्कामध्ये आल्याने या पाण्याचा रंग लाल होतो. अंटार्क्टिकाच्या मॅकमर्डो भागामध्ये हे ‘ब्लड फॉल्स’ आहेत. अंटार्क्टिका मधील बहुतेक प्रांत बर्फाच्छादित असला, तरी येथील ‘डॉन जुआन’ हा तलाव मात्र कधीही गोठत नाही. थंडीमध्ये या ठिकाणी -५० तापमान असले तरी या तलावाचे पाणी मात्र त्या भीषण थंडीमध्येही गोठत नाही. या तलावाचे पाणी अतिशय खारे असल्याने हे पाणी कधीही गोठत नाही.

Leave a Comment