व्हिडियो गेम्स खेळा आणि मालामाल व्हा !

game
आजकाल मोठमोठ्या मॉल्समध्ये खरेदी आणि खान-पान यांच्यासोबत तिथे असणारे गेमिंग झोन्सही अतिशय लोकप्रिय ठरत आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी तसेच मोठ्या माणसांना देखील खेळता येऊ शकतील अश्या निरनिराळ्या व्हिडियो गेम्स उपलब्ध करून दिलेल्या असतात. भारतामध्ये गेमिंग झोन्स अलीकडेच लोकांच्या परिचयाचे होऊ लागले असले, तरी अश्या प्रकारचे गेमिंग झोन्स पाश्चात्य देशांमध्येही गेली अनेक वर्षे अतिशय लोकप्रिय आहेत. यामध्ये आधी तिकीट काढून मग व्हिडियो गेम खेळायची असते. जर खेळणारा जिंकला, तर त्याला बक्षीसादाखल काही ठराविक रक्कम दिली जाते. केवळ २०१८ सालाचेच उदाहरण द्यायचे झाले, तर ‘न्यूझू’ ने दिलेल्या माहितीनुसार या पाश्चात्य देशांमध्ये, अश्या प्रकारच्या व्हिडियो गेम्स खेळण्यासाठी लोकांनी या वर्षामध्ये तब्बल १३५ बिलीय्म डॉलर्स खर्ची घातले असल्याचे समजते.
game1
या व्हिडियो गेम्सच्या माध्यामातून केवळ मोठमोठ्या गेमिंग कंपन्यांचाच नाही, तर या गेम्स खेळणाऱ्या मंडळींना देखील भरपूर आर्थिक उत्पन्न मिळत आहे. याच कारणामुळे काही लोकांनी तर व्हिडियो गेम्स हेच आपले आर्थिक उत्पन्न देणारे ‘फुल टाईम करियर’ म्हणून निवडले आहे. या गेम्स जिंकून त्यातून मिळालेल्या बक्षिसांच्या रक्कमांमुळे अनेक जण वयाची तिशी ओलांडण्याआधीच करोडपती बनले आहेत.

या गेम्स दोन प्रकारच्या असून, यामध्ये ‘इ-स्पोर्ट्स’ आणि ‘लाईव्ह स्ट्रीमिंग’ असे दोन प्रकार आहेत. ‘इ स्पोर्ट्समध्ये’, ‘कॉम्पिटीटिव्ह’ म्हणजे प्रतिस्पर्धा करावयाच्या गेम्स असून, यामध्ये फायटिंग गेम्स अधिक आहेत. यामध्ये दोन व्यक्ती किंवा दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळत असतात. ‘फिफा’ गेम्स हे अश्या प्रकारच्या खेळांचे उदाहरण आहे. या खेळामध्ये जिंकल्यानंतर खेळाडूला हजारो डॉलर्स बक्षीस म्हणून मिळत असतात. तसेच या गेम्स ऑनलाईन पाहणारे प्रेक्षकही हजारोंच्या संख्येने असल्याने या गेम्स अतिशय लोकप्रिय ठरत आहेत. त्यामुळे सध्या अनेक लोक केवळ इ-स्पोर्ट्स च्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळवीत आहेत.

Leave a Comment