दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी-20 मालिकेत खेळणार ही भावंडे


नवी दिल्ली – १५ सप्टेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

महेंद्रसिंग धोनीचा निवड झालेल्या संघात समावेश करण्यात आलेला नाही. यष्टीरक्षक म्हणून धोनीच्या जागी रिषभ पंतला संधी देण्यात आली आहे. भावांच्या दोन जोड्यांचा (हार्दिक पांड्या-कृणाल पांड्या आणि राहुल चहर-दीपक चहर) १५ जणांच्या या संघात समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ सप्टेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येत आहे. टी-20 मालिकेसाठी संघ निवडताना आगामी टी-20 विश्वचषकाचा विचार करूनच खेळाडूंची निवड केल्याची शक्यता आहे.

दक्षिण अफ्रिके विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडण्यात आलेला संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, वृषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.

Leave a Comment