तब्बल एवढे मानधन घेतात दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत


चित्रपटसृष्टीपासून राजकीय क्षेत्रापर्यंत सर्वत्र दाक्षिणात्य सिनेसृष्टीत देवाचा दर्जा प्राप्त असलेल्या सुपरस्टार रजनीकांत यांचा वावर पाहायला मिळतो. त्यामुळे केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नव्हे संपूर्ण जगभरामध्ये त्यांची लोकप्रियता आहे. ‘भाग्य देबता’ या बंगाली चित्रपटाद्वारे लोकांचे मनोरंजन करण्याच्या कसबीमुळे प्रेक्षकांची मने जिंकलेल्या रजनीकांत यांनी करिअरला सुरुवात केली.

विशेष म्हणजे अल्पावधीत लोकप्रिय झालेला हा कलाकार आज अनेकांच्या गळ्यातला ताईत झाला असल्यामुळेच त्यांचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतो. त्यांचे मानधनदेखील साहजिकच या लोकप्रियतेमुळे तितकचे जास्त असणार यात शंका नाही. रजनीकांत यांनी मानधनाच्या बाबतीत बॉलिवूडच्या ‘खाना’वळीलाही मागे टाकले आहे.

एका चित्रपटासाठी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान, सलमान खान हे सरासरी ४० ते ५० कोटी रुपयांचे मानधन आकारतात. पण तब्बल ६० कोटी रुपयांचे मानधन रजनीकांत हे एका चित्रपटासाठी घेतात. त्याचबरोबर चित्रपटाच्या कमाईमध्येही त्यांची अर्धी भागीदारी असते. त्यामुळे रजनीकांत हे सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेता आहेत. दरम्यान,त्यांचा काला आणि 2.0 हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 2.0 या चित्रपटासाठी त्यांनी ४० दिवसांच्या चित्रीकरणासाठी ६५ कोटी रुपयांचे मानधन मागितले होते.

Leave a Comment