या सरकारने पीटी उषा समजून छापला हिचा फोटो


राष्ट्रीय क्रिडा दिनाच्या निमित्ताने आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टनम येथे आयोजित कार्यक्रमात धावपटू पीटी उषाच्या ऐवजी चक्क टेनिसपटू सानिया मिर्झाचा फोटो छापण्यात आला. फोटो सानिया मिर्झाचा आणि खाली नाव पीटी उषा यामुळे आयोजकांची चांगलीच फजिती झाली.


सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर आयोजकांनी हे पोस्टर हटवले. अनेकांनी यावरून आयोजकांच्या अज्ञातावर टीका केली तर काहींनी त्यावर जोक्स शेअर केले.


या पोस्टरवर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा ही फोटो होता. यावरून त्यांच्या सरकारवर टीका करण्यात आली. त्यांच्या सरकारने राष्ट्रीय पातळीवर मेडल जिंकलेल्या खेळाडूंना पुरस्कार देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Comment