हिमेशच्या चित्रपटासाठी रानूने गायले दुसरे गाणे


पश्चिम बंगालमधील रेल्वे स्थानकावर गाणे गाऊन आपल्या पोटाची खळगी भरणाऱ्या रानू मंडल यांना त्यांच्या सुमधूर आवाजामुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. बॉलिवूडचा संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमियाच्या चित्रपटात गाणे गाण्याची संधी रानू यांना मिळाली. हिमेशच्या आगामी हॅपी हार्डी अँड हीर या चित्रपटासाठी रानू यांनी पहिले गाणे गायले. नुकतीच या गाण्याची एक झलक समोर आली होती. त्यानंतर हिमेश रेशमिया सोबतच आता रानू यांनी दुसरे गाणे रेकॉर्ड केले आहे. सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ब्लू कलरच्या साडीमध्ये रानू दिसत असून हिमेश रेशमिया त्यांच्यासोबत त्यांना गाइड करताना दिसत आहे. रानू यांचे हे दुसरे गाणे आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या गाण्याचा नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हिमेश रेशमियाने रानू यांना त्यांच्या पहिल्या गाण्यासाठी 5-7 लाख रुपये मानधन दिल्याचे चर्चा आहे. हिमेशने हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. ‘तेरी मेरी कहानी’नंतर रानू आता ‘हॅप्पी हार्डी और हीर’ या चित्रपटातील ‘आदत’ हे दुसरे गाणे रानू यांनी गायले आहे.

Leave a Comment